राज्य व्यवसाय नोंदवही

आयुक्तालयामार्फत ‘राज्य व्यवसाय नोंदवही (State Business Register)’ तयार करणे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत सर्व नोंदणीकृत व्यावसायिक संस्थांना एकाच पोर्टलवर आणले जाईल.

राज्य व्यवसाय नोंदवही (SBR) म्हणजे एकाच ठिकाणी वस्तू आणि/किंवा सेवांचे उत्पादन आणि/किंवा वितरणाशी संबंधित विविध आर्थिक कामे करणाऱ्या सर्व आस्थापना व उपक्रमांची एकत्रित यादी होय.

केंद्र व राज्य शासनाच्या खालील 7 अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत आस्थापनांची एकत्रित यादी तयार करण्यात येत आहे. i) कंपनी कायदा 1956 , ii) कारखाना अधिनियम 1948, iii) संस्था नोंदणी कायदा 1950, iv) सहकारी संस्था अधिनियम 1860, v) खादी व ग्रामोद्योग अधिनियम 1960, vi) उद्योग संचालनालय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अधिनियम 2006 , vii) दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियम 1960

या उपक्रमामुळे आस्थापना व उपक्रमांची सुधारित आणि अद्ययावत नमुना यादी, रोजगाराचे अधिक अचूक अंदाज, प्रभावी व पुराव्यांवर आधारित धोरण निर्मिती, विविध विभागांमधील व्यवसाय-संबंधित माहितीचे सुलभ एकत्रीकरण व व्यवस्थापन होण्यास मदत होईल.